दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रमुख लढत असून संविधान समर्थन समिती नक्की कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार ? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
नुकतीच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले असल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कोणताही उमेदवार फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नसणार आहे; हे स्पष्ट झाले आहे.
“एकच निर्धार; बौद्ध आमदार” ही चळवळ गेल्या काही महिन्यांपासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात संविधान समर्थन समितीच्या वतीने सुरू करण्यात आली होती.
समितीच्या वतीने काही अपक्ष अर्ज दाखल करण्यात आले आहेत; यामध्ये समिती नक्की कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सुद्धा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.