आज दिवसभरात एकूण 32 कोरोना बाधित : जिल्ह्याची कोरोना बाधीत एकूण संख्या 484


स्थैर्य, सातारा दि. 29 : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 24 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. फलटण तालुक्यातील होळ येथील 85 वर्षीय वृध्द महिला  ‘सारी’ ने  आजारी होती.  काल दिनांक 28 मे रोजी तिचा मृत्यु  झाला होता. मृत्यू पुर्वी तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते ते तपासणीमध्ये तो रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

24 बाधित रुग्णांची  तालुकानिहाय गावे आणि संख्या पुढीलप्रमाणे..

फलटण तालुक्यातील वडले येथील 1, जोरगाव येथील 1, होळ येथील 1 (मृत वृध्द महिला), साखरवाडी येथील 1.

माण तालुक्यातील म्हसवड येथील 1, दहीवडी येथील 1, राणंद येथील 1.

पाटण तालुक्यातील नवारस्ता येथील 1, जांभेकरवाडी (मरळोशी) येथील 2, आडदेव येथील  1.

खटाव तालुक्यातील अंभेरी येथील 5, निमसोड येथील 1, कलेढोण येथील 2.

सातारा तालुक्यातील निगुडमळा (ग्रामपंचायत परळी) येथील 1,

वाई तालुक्यातील मुंगसेवाडी येथील 2.

जावळी तालुक्यातील आंबेघर येथील 2


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!