
अट्टहासाने जोपासलेला राग, दुसर्याने भरवलेले कान आणि वैर भावनाच माणसाला जास्त थकवते. हे ज्यांना समजत नाही, त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे हे आयुष्यभर उमगत नाही.
राग, क्रोध, तापट प्रवृत्ती आपणाला विनाशकारी भूमिका बजवण्यास भाग पाडते. दुसऱ्याच्या चुकीमुळे, कृत्यांमुळे, त्रासाने, वागण्याने, हिणवण्याने आपणांला अति राग येतो. तसेच प्रत्येकाने आपल्या मनासारखे वागावे, ऐकावे असे न झाल्यास राग येतो.
रागावर नियंत्रण करण्यासाठी समोरिल व्यक्तीला समजून घेणे, सुधारणेची संधी देणे, माफ करणे. एवढे होऊनही आपणाला त्या व्यक्ती बद्दल रागच येत असेल. तर आपण शांत, मौन, बोलून मोकळे अथवा संपर्कात न येणे. ह्या मार्गाचा अवलंब करावा.
क्षणाचा राग कोणत्या स्तराला जाईल सांगता येणार नाही. तो क्षण सावरण्यासाठी योगा, प्राणायाम, व्यायाम, सात्विक आहार, वाचन, लेखान, मोकळे ढाकळे बोलणे, व्यसना पासून दूर, योग्य संगत ह्या साधनांने राग नियंत्रित रहातो.
रागच का येतो ? तर सहनशीलता कमी, पूर्वग्रह दुषित पणा, स्वभाव प्रवृत्ती, समजून घेण्यापरीस माझंच खरंय याने राग येतो. क्रोधीत व्यक्ती दुस-यावर रागवते. पण स्वतःचे नुकसान करीन घेते. शरिरावर ताबा, बोलण्याचे भान, कोणतेही साधन सापडेल त्याने कृती करणे. वेळीच सावध व्हा. अन्यथा रागाच्या भरात अन् बाराच्या भावात आपण जाणार नाही. याची काळजी घ्यावी.
शीघ्रकोपी माणसे माणसांत न रहात बाजूला एकाकी पडतात. मग ताणतणाव, व्याधी, व्यसनी होऊन वेळीच सावरली नाहीत. तर काही ही जीवनात घडू शकते.