आज १९ एप्रिल – आई बोलायला अन् बायको गप्प बसायला शिकवते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


शिर्षक वाचून जरा हसू आले असेल. पण खरंय ते खरंच देव सुद्धा नाकारु शकत नाही. देवाचा तरी लै काय येगळा अनुभव नाही, इचारुन पहा. मुळ मुद्दा लहानपणी आपण बोलावे म्हणून आई किती प्रयत्न करते. नवसासायसा करुन लेकरांने बोलावे. म्हणून तिचा जीव तीळतीळ तुटायचा. लेकरु बोलायला लागल्यावर ती बारा हत्तीच बळाने संसाररुपी गाडा नेटाने ओढायची.

लेकरु चुरुचूर बोलतंय, लै ग्वाड बोलतंय, आये काम करुन थकली असशील आराम कर असं म्हणल्यावर तर दिसाचा शिणवटाचा जायचा.

लेकाच्या डोईवर तांदूळ पडलं अन् अंतरपटाचे अंतर वाढतच गेलं. आयबिगर घास न खाणारं लेकरु जेवशीलस का ? हे भी इचाराना. तवा आईच्या डोसक्यात उजेड पडला. लेक बोलत नवता तवा किती प्रयत्न करुन किती बोलायला शिकवला. अन् आता पोपटावानी बोलणारा नुसता घुम्यावानी वागतोय. आईनं हेरलं अंतरपाटाने अंतर वाढविले.

नुसतं आयं आयं करायच होतं तर लगीनच करायच नव्हत. लाडाने वाढविल नुसंत आईच्या ऐकण्यातलं राहिलं. माझं ऐका नुसता फायदाच. राघूला मैनंने घेरलं. आईशी पोपटावानी बोलणारं मैनेमुळे मोजकंच बोलू लागलं. गप्प बसा. तुम्हांला म्हणून सांगतेय. माझंच ऐका. नुसतं गप्प बसा.

लेकरुपी नवरा नेमकं ऐकायचं कुणाचं या अडकित्यारुपी पात्यात अडकलेल्या सुपारीवानी अवस्था होऊन बसलीय. त्याने मध्यम, सबुरीचा मार्ग निवडून आईला न दुखवता व बायकोला न सतवता तारेवरंची कसरत निभावणे. हसून खेळून बोलून शांत राहून अंतरपटातील अंतर वाढू न देता. आईचं अन् बायकोचं ऐकावे. दोन्हीचा ही मेळ घालावा. दोघींना हात जोडून विनंती की लेकाला अन् नवऱ्याला कुठं बोलावं अन् गप्प रहाव. हे शिकवावं. शेवटी तो ठरविलं किती बोलायच, काय बोलायच, कुणाशी बोलायच पण तुम्ही दोघी मात्र बोलत रहा.

आई अन् बायको दोघीच ऐका अन् संसार नीटनीटका करा

आपलाच दोघींचा ऐकीव – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!