भारतीय इतिहासात जगावे कसे हे शिवाजीराजेंनी शिकवले व मरावे कसे हे संभाजीराजेंनी शिकवले. वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत बुद्ध भूषण ग्रंथ निर्मिती. एका ही लढाईत पराजित नसून परकियांच्या मनात धडकी निर्माण करणारे अलौकिक व्यक्तीमत्व. धर्म हाच प्राण हे ज्यांनी आपल्या पराक्रमाने शिकवले व जगून दाखविले त्या शंभूराजांचा इतिहास नव्या पिढीला ज्ञात होणे. ही खरी त्यांच्या कार्यपूर्तीची प्रेरणा होय.
आंद्यक्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले बोलते नसून कर्ते समाजसुधारक. मुलींची शाळा शुभारंभ, सत्यशोधक समाजस्थापना, अस्पृश्य निर्मुलन, रुढी, परंपरा, कर्मकांड विरोधी आवाज. ईश्वरासाठी निर्मीक संज्ञा, ग्रंथ लेखन, शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून शिवजयंतीत्सवास सुरुवात, स्त्री वर्गाला प्राधान्य देऊन सावित्री माईची खंबीर साथ.
छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रत्येक समाज्याससाठी कार्य केले. आपण महापुरुष जातीच्या चौकटीत बंदिस्त न करता त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन वाटचाल करावी.