फलटणमध्ये शिवीगाळ करून मारहाण; शहर पोलिसात गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 16 डिसेंबर 2023 | फलटण | येथील सोमवार पेठमध्ये पूर्वीची केस मागे घेण्यासाठी फिर्यादी सौ. वैशाली मिथुन जाधव व त्यांचे पती यांना शिवीगाळ करत मारहाण केली असल्याची घटना फलटणमध्ये घडली आहे; याबाबत फिर्यादीनुसार फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि; फिर्यादी किराणा दुकानात तेल आणणेसाठी घराच्या बाजुच्या बोळीतुन जात असताना कविता नरेश पवार, सुनिता अनिल जाधव, प्रमोद अनिल जाधव, नरेश सोमा पवार, अनिल सायबु जाधव, अविनाश अनिल जाधव हे आले व त्यांनी आपसात संगणमत करुन बोळीत येवुन प्रमोद जाधव हा फिर्यादीस म्हणाला की, सोमा शेठ वर केलेली केस मागे घे, नाहीतर तुला जिवे मारीन; त्यावर फिर्यादी त्यांना केस कशासाठी मागे घेवु ? असे म्हणाले असता वरील सर्वानी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केल्याने फिर्यादीचे पती मिथुन हे तेथे आले असता त्यांनाही वरील सर्वानी हाताने मारहाण केली. त्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलीसांनी फिर्यादीस उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे उपचार करणे करीता दाखल केले.


Back to top button
Don`t copy text!