फलटणमध्ये रास्त धान्य दुकान सुरू करायचं आहे; तर हे वाचा…..


दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2024 | फलटण | फलटण तालूक्यातील एकूण पाच रास्तभाव दुकानांचा जाहिरनामा काढणेत आलेला आहे. त्यानुसार मानेवाडी (ताथवडा), वडजल, चांभारवाड़ी, माझेरी, गोळेवाडी या गावारिता नवीन रास्तभाव दुकानांचा जाहिरनामा निघालेला आहे. 31 जानेवारी 2024 अखेर इच्छुक बचतगट संस्था यांनी तहसिल कार्यालय फलटण (पुरवठा शाखा) येथे अर्ज करावायचे आहेत; अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.

यासाठी महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे शासन निर्णयामध्ये नमूद तरतुदीचे अवलोकन करणेची विनंती आहे. या शासन निर्णयानुसार पंचायती स्वयं सहायता गट, सहकारी संस्था, महिला बचत गट इत्यादीना प्राथम्य क्रमानुसार प्राधान्य देणेत येईल यासाठी शासन निर्णयात नमूद केलेप्रमाणे समिती निर्णय घेणार आहे; असेही तहसीलदार जाधव यांनी स्पष्ट केले.

याबाबत जाहिरनाम्यामध्ये नमूद केलेप्रमाणे तहसिल कार्यालय फलटण येथून विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन येऊन तो परिपूर्ण अर्ज भरुन यासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे यांचेसह तहसिल कार्यालय फलटण पुरवठा शाखा येथे विहीत मुदतीत इच्छुक संस्थानी अर्ज करावेत असे आवाहन तहसिल कार्यालय फलटण यांचेतर्फ करणेत येत आहे.

सदर जाहिरनामा वरील पाच ठिकाणी तलाठी, चावडी आणि तहसिल कार्यालय फलटण यांचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करणेत आला असून तो नीट वाचून यातील अटी शर्तीचे पालन करुन याप्रमाणे अर्ज सादर करावेत असे आवाहन देखील तहसिल कार्यालय फलटण यांचे तर्फे करणेत येत आहे.


Back to top button
Don`t copy text!