स्थैर्य, सोळशी, दि. १६: वाठार स्टेशन, ता. कोरेगाव परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्या पाठोपाठ पडलेल्या गारांचा रस्त्यावर व शेतात खच पडला होता. त्यामुळे कमी पावसाच्या या पट्ट्यात मिनी काश्मीर अवतरले की काय याचा भास होत होता. गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्ष बागांबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे बुधवार दिनांक १४/०४/२०२१ रोजी उत्तर कोरेगाव भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन संबंधीतांना अधिकार्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या आमदार दीपक चव्हाण यांनी दिल्या. त्यावेळी आमदार दीपक चव्हाण बोलत होते.