दैनिक स्थैर्य । दि.२५ मार्च २०२२ । मुंबई । वनहक्कधारकांचे प्रलंबित दावे, अपिले व अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी श्रमिक मुक्ती संघटना, मुरबाड यांनी धरणे आंदोलने केले होते. यासंदर्भात कल्याण तालुक्यातील 3 वनहक्क दाव्यापैकी 2 दावे जिल्हास्तरीय समितीने अमान्य केले असून 1 दावा जीपीएस मोजणीकरिता वनक्षेत्रपाल कल्याण यांच्याकडे प्रलंबित आहे. मुरबाड तालुक्यात 29 प्रलंबित वनहक्क दाव्यांबाबत बैठक घेण्यात आली असून काही दावे जीपीएस मोजणी व गुगल इमेजसाठी वनक्षेत्रपाल यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. शहापूर तालुक्यातील 203 प्रलंबित दाव्यापैकी 63 दावे मान्य करण्यात आले असून 16 दावे अमान्य करण्यात आले, 33 दाव्यांमध्ये त्रुटी आढळली तर 11 दावे जिल्हास्तरीय समितीच्या निर्णयास्तव प्रलंबित आहे. प्रलंबित वनहक्क दाव्यांची संख्या पाहता या दाव्यांकरिता एक बैठकीत धोरण ठरवू, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री ॲड के.सी. पाडवी यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य रविंद्र फाटक, शशिकांत शिदे, जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.