
स्थैर्य, फलटण दि.५: आजच्या युवा पिढीला आपल्या संस्कृतीची व इतिहासाची माहिती करून देणे आवश्यक आहे. मुलांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तिरंगा फाउंडेशन नेहमीच करते. सामाजिक विचारांनी प्रेरित व राष्ट्रीय एकात्मता अबाधीत राहण्यासाठी विविध कार्यक्रम या ठिकाणी नेहमीच होत असतात. युवा पिढीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तिरंगा फाउंडेशन अग्रणी संस्था आहे, असे गौरवोद्गार गड, किल्ल्यांचे अभ्यासक व सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे वंशज मारुती आबा गोळे यांनी काढले. तिरंगा फाऊंडेशनच्यावतीने मारुती आबा गोळे यांचा विशेष सत्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अव्हिएशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक भारत पाटील, गोळेवाडीचे सरपंच शंकर गोळे, तिरंगा फाऊंडेशनचे डायरेक्टर डॉ. पोपटराव मोहिते व प्रा. रवी तिकटे व यांच्यासह तिरंगा फौंडेशनच्या विविध संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.