स्थैर्य, मुंबई, दि. 03 : पुढच्या महिन्यात पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे, असं महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना मात्र त्यांनी निश्चिंत राहण्यासही सांगितलं. ते म्हणाले, “जे कोरोनासाठी काम करतायत, त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबत थोडसं मागे पुढं होऊ शकतं.”
चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असं वडेट्टीवारांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.
यावेळी वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “केंद्र सरकारकडून कुठलीच मदत झालेली नाही. PM केअर फंडाला मदत करण्यास सांगणारे ‘महाराष्ट्र द्रोही’ आहेत.”
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजूनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत, असंही वडेट्टीवार म्हणाले.