स्थैर्य, सातारा, दि.२०: शेतातील हद्दीवर ठिबकची पाईप टाकल्याच्या कारणावरून दगडाने मारहाण करून एकाने तिघाजणांना मारहाण केली. प्रकाश सर्जेराव भोसले रा. गोवे (लिंब), ता. सातारा असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, गोवे लिंब गावच्या हद्दीतील हाराटी नावच्या शिवारात फिर्यादी राजन संजय भोसले यांच्या शेतात ठिबकची पाईप टाकल्याच्या कारणावरून संशयित प्रकाश भोसले याने राजन भोसले यांना दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच दगडाने हातात, पाठीवर व डाव्या हातात मारून जखमी केले. यावेळी भांडणे सोडवण्यास आलेल्या राजन यांच्या आई मंगल भोसले आणि वडिल संजय भोसल यांनाही मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी प्रकाश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला असून हवालदार बागवान तपास करत आहेत.