स्थैर्य, कोळकी, दि. ७ : कोळकी गाव विकासकामात नेहमी अग्रेसर असावे, या दृष्टीने विकासकामांची मोठी जंत्री घेवून प्रभाग 3 चे राष्ट्रवादीचे उमेदवार कामठे, सौ. देशमुख व सौ. चव्हाण प्रभागातील जनतेसमोर जात आहेत. कोळकी गाव हे फलटणशेजारी असल्याने भविष्यात याठिकाणी लोकसंख्या वाढणार आहे. ही दूरदृष्टी ठेवून कोळकीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, बंदिस्त गटार योजना अशा महत्त्वकांक्षी योजना राबवण्याचा निर्धार तर केला आहेच शिवाय प्रत्येक वार्डात अंतर्गत रस्ते, डांबरीकरण व काँक्रिटीकरण, गार्डन विकसीत करणे, समाजमंदीर व मंदिराचा विकास अशा विविध विकासकामांतून कोळकी हे टूमदार गाव करण्याचा ध्यास राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांनी उराशी बाळगला आहे. गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला विविध मानांकन मिळवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे संजय बबन कामठे, सौ. रेश्मा संजय देशमुख, सौ. रुपाली सागर चव्हाण यांनी सांगितले आहे.
फलटण तालुक्यात सध्या ग्रामंपचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोळकी गावात विकासकामांचा अजेंडा घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मतदारांचा जात असल्याने मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील कोळकीचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे होत आहे. याच गावातील प्रभाग 3 मधून राष्ट्रवादीच्या संजय बबन कामठे, सौ. रेश्मा संजय देशमुख, सौ. रुपाली सागर चव्हाण हे निवडणुकीला सामोरे जात आहेत.
विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा भक्कम पाठिंबा असल्याने गावात विकासकामांचा मोठ्या प्रमाणावर निधी आणता येणार आहे. कोळकी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेने आशिर्वाद द्यावा, असे आवाहन कामठे, सौ. देशमुख व सौ. चव्हाण यांनी केले आहे.