राष्ट्रीय महामार्गावर शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघा दरोडेखोरांना चार वर्षे सक्तमजुरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. १५ : राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ धारदार शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणार्‍या तिघांना न्यायालयाने 4 वर्षे सक्तमजुरी व 500 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा ठोठावली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी ही शिक्षा सुनावली. दरम्यान, गुन्ह्यातील फरार आरोपीचा पोलिसांनी शोध घ्यावा, असा आदेशही न्यायालयाने दिल्याची माहिती सरकारी वकिल राजेंद्र सी. शहा दिली.

सुनील मारुती उबाळे (रा. वाळवा, जि. सांगली) विकास वसंत गुंड उर्फ निकम (रा. भाटवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) व प्रमोद मंगेश साठे (रा. वाटेगाव, जि. सांगली) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तर रविद्र धर्माजी सुर्यवंशी (रा. आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे फरार असलेल्यांची नावे आहेत.

सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार 29 एप्रिल 2016 रोजी रात्री गोपाल राम ठाकूर (रा. खालापूर, जि. रायगड) हे कार मधून कुटुंबियांसह प्रवास करत असताना महामार्गावर सम्राट हॉटेल जवळ थांबले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दागिने व रोख रक्कम असे एकूण 5 लाख 55 हजारांचा मुद्देमाल घेऊन तेथून पोबारा केला होता. याबाबत गोपाळ ठाकूर यांनी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली होती.

त्यावरून पोलीस निरीक्षक ए. आर. मांजरे यांनी तपास करत तीन संशयितांना अटक केली तर एकजण फरार आहे. अटक केलेल्या संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, मोबाईल, दागिने पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. एम. व्ही. कुलकर्णी यांनी सहकार्य केले. तसेच पोलीस म्हणून ए. व्ही. खिलारे, ए. डी. पाटील, मदने, गोविंद माने, चव्हाण यांनी सहकार्य केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!