तिघा तोतया पोलिसांना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोल्हापूर, दि. 23 : लॉकडाऊन काळात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी नियुक्त आहे, असे सांगून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना लुट करणाऱ्या तिघा तोतया पोलीसांना करवीर पोलीसांनी शनिवारी अटक केली. गेल्या साठ दिवसांपासून या टोळीने दहा ते बारा जणांची लुटमारी केल्याचा पोलीसांना संशय आहे.

करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यात अनेक वाहनधारकांची लुटमारी होत असल्याची चर्चा सुरू होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना समजल्यावर त्यांनी करवीर पोलिसांना पथक नेमून खातरजमा करावी, असे आदेश दिले होते.

करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे पोलीस हवालदार प्रशांत माने आदींचे पथक नेमले होते. त्यात हुपरी परिसरातील टोळीचा छडा करवीर पोलिसांनी लावला. तात्काळ या टोळीतील तिघांना शनिवारी पहाटे अटक केली.

टोळीचा मोरक्या शितल विजय वडगावकर-कांबळे (रा.शाहू नगर हुपरी), अण्णा आनंद शिंदे (वय ३२ रा.रेंदाळ तालुका हातकणंगले), विकास सुरेश शिंदे (वय ३५,रा.तळसंगी फाटा इंगळे तालुका हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी शितल वडगावकर-कांबळे हा कोडोली येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचा स्वयंसेवक कार्यकर्ता असल्याचे त्याच्याकडे ओळखपत्र सापडले आहे.

आपली आपत्ती व्यवस्थापनावर निवड झाल्याचे तसेच ठिकाणी नियुक्त झालेल्या नाकाबंदी पॉईंटवर आपणाला वाहन तपासणीचे आणि कारवाईचे अधिकार देण्यात आल्याचे भासवून ही टोळी रात्री-अपरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची तसेच ई पास ची मागणी करीत होते. कागदपत्रे नसल्यास मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने काढून घेत असत. या टोळीने तालुक्यात धुमाकूळ घातला होता. टोळीतील आणखी दोघेजण पसार झाले आहेत. त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!