उपळव्याच्या स्वराज कारखान्यात तीन लाखाची चोरी 


स्थैर्य, फलटण, दि. १२ : स्वराज इंडिया ॲग्रो साखर कारखाना उपळवे ता. फलटण येथून सुमारे तीन लाख १४ हजार ७५२ रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी चौघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजण्यापूर्वी उपळवे ता. फलटण येथील स्वराज इंडिया ॲग्रो साखर कारखाना स्टोअर रूममधून संशयित विक्रम गणेश जगदाळे रा. सांगवी ता. बारामती, शशिकांत विष्णू कदम रा. दर्याचीवाडी ता. फलटण, अक्षय रामचंद्र जाधव रा. श्रीराम नगर उपळवे ता. फलटण, अमोल अरविंद शिंदे रा, शिंदेवाडी ता. फलटण  यांनी १ लाख ७३ हजार ५२० रुपये किंमतीचे गनमेटल बुश, १ लाख ४१ हजार २३२ रुपये किंमतीचे ब्रास, लाइनर असा एकुण तीन लाख १४ हजार ७५२ रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याची तक्रार अनिलकुमार पांडुरंग तावरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.याबाबत पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!