पक्षविरोधी काम केल्याबद्दल तिघांची भाजपमधून हकालपट्टी


स्थैर्य, 1 फेब्रुवारी, सातारा : भारतीय जनता पक्षातर्फे कराड उत्तर मतदारसंघातील तिघांवर पक्षविरोधी काम केल्याबद्दल हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, महादेव साळुंखे, सचिन नांगरे यांच्यावर पक्षाने ही कारवाई केल्याची माहिती पक्षाचे – जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांनी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या वेताळ यांनी कोपर्डे हवेली जिल्हापरिषद गटामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच रामकृष्ण वेताळ यांनी जाहीरपणे त्यांचा प्रचार सुरु केला आहे. महादेव साळुंखे यांनी भाजपकडून तिकिट मिळाले नाही म्हणून शिवसेनेकडून उंब्रज गटामध्ये उमेदवारी कायम ठेवली आहे. तर सैदापूर गटामधून सचिन नांगरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने अधिकृत उमेदवार उभे केले असतानाही पक्षाची शिस्त मोडून या तिघांनी उमेदवारी


Back to top button
Don`t copy text!