
दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2025 | फलटण | शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता श्री सटवाई देवीच्या मूर्तीची गावप्रदक्षिणा करून कोळकी येथील त्रिदिवसीय यात्रा उत्साहात सुरू झाली. देवीच्या भक्तांनी गावभर प्रदक्षिणा करत मांडविक रूपात भक्तीभावाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी ६:४५ वाजता धान्यवासाच्या कार्यक्रमाने पहिल्या दिवसाचे समारोप झाले.
रविवार, २० एप्रिलला सकाळी ८:१५ वाजता श्री गणपती पूजन व स्वस्ति पुण्याहवाचनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी ११ ते १२:३० या वेळेत महाअभिषेक, तर दुपारी १२:३० ते २:०० दरम्यान होम हवन विधी पार पडला. दुपारी २:३५ वाजता प्राणप्रतिष्ठा, ३:०० वाजता महानैवेद्य व महाआरती, तर ३:३० वाजता होम हवनला वसलेल्या दांपत्यांना भोजन देण्यात आले.
सोमवार, २१ एप्रिलला सकाळी ६:०० वाजता महाअभिषेक, ७:०० वाजता सत्यनारायण पूजा, तर ८:०० ते ९:०० या वेळेत पालखी प्रदक्षिणा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९:०० ते १२:०० या अवधीत दुर्गा भजनी मंडळाचे भजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दुपारी १२:०० वाजता आरती उरकल्यानंतर १२:०० ते २:०० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसाद वाटण्यात येईल. यात्रेच्या शेवटी सर्व भाविकांनी देवीचे आशीर्वाद घेऊन गावाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे अनुभवायला मिळणार आहे.