वाई पोलिसांकडून तीन चोरीचे गुन्हे उघडकीस तीन चोरटे व एका अल्पवयीनाकडून चोरीचा ऐवज हस्तगत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१० जानेवारी २०२२ । वाई । वाई पोलिसांनी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.तीन चोरटे व एका अल्पवयीनाकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे.

शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तशा तक्रारीही वाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला सुचना दिल्या होत्या. चोरी, घरफोडीच्या अनुषंगाने तपास करत असताना पथकास सुचना मिळाल्याने सतिश संजय जाधव (वय १९ वर्षे), गणेश शंकर जाधव (वय-२२, रा. गुरेबाजार झोपडपट्टी, वाई), सुनिल विलास पवार (वय ३६ रा. वेळे ता. वाई) या तिघांना ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. गंगापूरी व मच्छि मार्केट वाई येथील नविन बांधकामाच्या ठिकाणच्या वीस सेंन्ट्रींग प्लेटा, पुलाच्या नविन बांधकामाच्या ठिकाणची केबल चोरली असल्याचे कबूल केले असून त्यांनी चोरलेला सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.
तसेच तर्कतिर्थ शाळेमध्ये चोरीला गेलेला संगणक व साहित्यही हस्तगत केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जान्हवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!