
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । सातारा । येथील नटराज मंदिरासमोर दि. 2 रोजी अर्जुन वाघ यांचा डोक्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने वाई येथून दि. 4 रोजी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हा खून अभिजीत ऊर्फ भैया शिवाजी मोरे याच्याशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा : ०२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३.३० वा.चे. सुमारास सातारा शहरातील नटराज मंदिराचे मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोकळ्या जागेत दोन अज्ञात इसमांनी एका अज्ञात इसमावर पिस्तुलाने गोळ्या घालून त्याचा खून केला होता. याप्रकरणी सदरबाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा अतिशय गंभीर असल्याने श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक , सातारा यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट दिली . घटनास्थळाची पाहणी करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना श्री . किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांना दिल्या . त्यांनी सपोनि रमेश गर्जे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक तपास पथक तयार करुन सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघड करणेबाबत सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळावरील व आजूबाजूचे परिसरातील साक्षीदार यांचेकडे विचारपुस केली . गुन्हा घडल्यानंतर काही वेळातच तपास पथकाने मयत इसमाची ओळख पटवली . मयत इसम हा वाई येथील अर्जुन यादव असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने वाई येथे जावुन तपास केला असता त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की , १३ मे २०२० रोजी अभिजीत ऊर्फ भैया शिवाजी मोरे , रा.गंगापुरी , वाई याचेवर यातील मयत अर्जुन ऊर्फ राणा मोहन यादव याने केलेल्या गोळीबाराचा राग मनात धरुन अभिजीत ऊर्फ भैया शिवाजी मोरे यानेच त्याचे साथीदारांसह अर्जुन ऊर्फ राणा यादव याचेवर पिस्तुलाने गोळ्या घालून त्याचा खुन केला असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली . त्याप्रमाणे गुन्हयातील संशयीतांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाहीत . परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली गोपनीय यंत्रणा सक्रीय करुन माहिती काढली असता त्यांना आज दिनांक ४ जुलै २०२२ रोजी सकाळी माहिती प्राप्त झाली की , गुन्हयात सहभागी असलेले ३ आरोपी गुन्हा केल्यांतर पळुन गेले होते परंतु ते आता वाई परिसरात आलेले आहेत . अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना आज दिनांक ४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.३५ वाजता वाई शहरातुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा अभिजीत ऊर्फ भैया शिवाजी मोरे , रा . गंगापुरी वाई तसेच सोमनाथ ऊर्फ सोन्या शिंदे रा . रविवारपेठ वाई यांचेसह केल्याचे सांगीतले आहे . त्यांना पुढील तपासकामी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे . गुन्हयामध्ये याशिवाय आणखी कोणाचा संबंध आहे काय , गुन्हा करण्यामागे नक्की काय कारण आहे तसेच मयत आणि आरोपी हे नटराज मंदीर परिसरात वाईवरुन नक्की कशासाठी आले होते याबाबत तांत्रीक बाबी तपासुन गुन्हयाचा सखोल तपास करण्यात येणार आहे .
श्री . अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक , सातारा व श्री . अजित बोन्हऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक , सातारा यांचे सूचना प्रमाणे श्री . किशोर धुमाळ , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे , पोलीस उप निरीक्षक अमित पाटील , पोलीस अंमलदार संजय शिर्के , विजय कांबळे , आतिश घाडगे , विश्वनाथ संकपाळ , शरद बेबले , प्रविण फडतरे , प्रमोद सावंत , विशाल पवार , रोहित निकम , सचिन ससाणे , मुनीर मुल्ला , प्रविण कांबळे , प्रविण पवार , विक्रम पिसाळ , स्वप्नील माने , स्वप्निल दौड यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री . अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा व श्री . अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा , श्री . मोहन शिंदे , पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा , सातारा तात्पुरता कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांनी अभिनंदन केलेले आहे.