
राजकारणात पद येते आणि जाते, पण जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा नेता क्वचितच भेटतो. “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” हा डायलॉग खऱ्या आयुष्यात जगून दाखवणारे, ज्यांच्या शब्दाला आणि मैत्रीला सत्तेपेक्षा जास्त किंमत आहे, असे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजपचे आक्रमक व दूरदृष्टीचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस. गेल्या वर्षभरातील त्यांचा प्रवास पाहिला तर एका गोष्टीची खात्री पटते – रणजितदादा हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते जिद्दीने पेटलेला ‘फिनिक्स’ आणि मनाचा ‘राजा’ माणूस आहेत.
पराभवातून विजयाचे शिल्पकार: “टायगर अभी जिंदा है!”
मागील वर्षी (सन २०२४) लोकसभेत आलेल्या अपयशानंतर सामान्य नेता खचून गेला असता. अनेकांना वाटलं की आता खेळ संपला, पण दादांनी आपल्या कृतीतून विरोधकांना दाखवून दिले की, “हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है!” तो पराभव त्यांनी एका ‘योद्ध्या’प्रमाणे स्वीकारला. त्यांनी कोणावरही टीका केली नाही की कोणाचा द्वेष केला नाही. उलट, “माझा लढा सत्तेसाठी नसून माझ्या मातीसाठी आहे,” हे त्यांनी सिद्ध केले. स्वतःच्या पराभवाचे दुःख बाजूला सारत, एका सामान्य शेतकरी कुटुंबातील सचिन पाटील यांना ताकद दिली आणि विधानसभेत पाठवून ‘किंगमेकर’ची भूमिका निभावली. नगरपालिकेतही त्यांनी समशेरसिंहांच्या रूपाने विकासाचा झेंडा रोवला. स्वतःच्या स्वार्थापेक्षा कार्यकर्त्यांना मोठे करणारे हे नेतृत्व म्हणूनच जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.
मैत्री आणि शब्द: “एक बार जो कमिटमेंट कर दी…”
राजकारणात ‘शब्दाला जागणारी’ माणसं आता दुर्मिळ झाली आहेत. पण “एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो फिर मैं अपनी आप की भी नहीं सुनता!” हा डायलॉग जर कुणाला तंतोतंत लागू पडत असेल, तर तो रणजितदादांना. ज्या कुणीही रणजितदादांसोबत काम केले आहे, त्यांना हे पक्के माहीत आहे की काहीही झाले तरी दिलेला शब्द दादा पाळतातच. यासाठी अगदी कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी ते मागे हटत नाहीत. जो कोणी कार्यकर्ता किंवा मित्र त्यांच्याशी एकदा जोडला गेला, त्याच्यापुढे ढाल बनून उभे राहण्याची धमक आज फलटणच्या राजकारणात फक्त रणजितदादांमध्येच आहे. त्यांच्या डिक्शनरीत “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे” हेच सूत्र कायम असते.
स्वप्न जिल्ह्याचे, ध्यास विकासाचा: “जो मैं बोलता हूँ, वो मैं करता हूँ!”
“दादा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या? फायर है मै!” हा डायलॉग त्यांच्या विकासाच्या धडाक्याला अगदी शोभून दिसतो. फलटणला स्वतंत्र ‘जिल्हा’ करण्याचे स्वप्न आजवर कोणी पाहिले नव्हते, पण दादांनी ते धाडस केले आणि “जो मैं बोलता हूँ, वो मैं करता हूँ” या उक्तीप्रमाणे नुकतेच ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय’ मंजूर करून त्या दिशेने पहिले ऐतिहासिक पाऊल टाकले. यासोबतच ‘वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय’ सुद्धा नुकतेच सुरु झाले आहे. नीरा-देवधरच्या पाण्यापासून ते रेल्वे, रस्ते आणि प्रशासकीय इमारतींपर्यंत… फलटणच्या कानाकोपऱ्यात दिसणारा विकास हा रणजितसिंहांच्या दूरदृष्टीचा साक्षीदार आहे.
संवेदनशील आणि ‘दिलखुलास’ दादा: “बडे दिलवाला”
राजकीय नेत्याची एक चौकट असते, पण रणजितदादा त्या चौकटीबाहेरचे आहेत. लोकसभेच्या पराभवाच्यानंतर मतमोजणीवरून परतताना मुलींची पायपीट पाहून वीस हजार सायकली वाटणारे संवेदनशील दादा असो, किंवा जुन्या मित्राच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारणारे ‘दिलखुलास’ दादा असो; त्यांच्यातल्या ‘माणसा’चा ओलावा कधीच आटला नाही. “आपली रेष मोठी करून दाखवणे” या सकारात्मक विचारसरणीमुळेच आज ते तरुणाईचे ‘आयडॉल’ (रिअल हिरो) बनले आहेत.
भविष्याचा वेध…
आगामी काळात फलटणला ‘जिल्हा’ घोषित करणे आणि टाऊन प्लॅनिंगसारखी कार्यालये आणणे, हे त्यांचे लक्ष्य आहे. ज्या वेगाने आणि जिद्दीने त्यांची वाटचाल सुरू आहे, ते पाहता हे स्वप्नही सत्यात उतरेल यात शंका नाही. कारण “डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है,” तशीच फलटणची जनता या नव्या पर्वाची वाट पाहत आहे!
फलटणच्या विकासाचा हा ‘झंझावात’ असाच अविरत सुरू राहो. मैत्रीला जागणारा, शब्दाला पक्का असणारा आणि विकासाचा ध्यास घेतलेला हा ‘सिंहाचा छावा’ शतायुषी होवो, हीच आजच्या शुभदिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!

