दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी चिठ्ठी उचलून निवडून आलेल्यांनी आपली भाषा जपून वापरावी. जर खर्च तुमच्यात हिम्मत होती तर तुम्ही बिनविरोध किंवा बहुमताने निवडून येणे गरजेचे होते. चिठ्ठीच्या नशिबाने जो संचालक म्हणून विराजमान झालेला आहे. त्यांनी विधानपरिषदेचे सभापती व आमचे नेते ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत बोलताना तारतम्य बाळगूनच बोलावे. आम्हाला सुद्धा जस्यास तसे उत्तर देता येते हे लक्षात ठेवा, अशी प्रतिक्रिया श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक किरण निंबाळकर यांनी दिलेली आहे.
यावेळी अधिक बोलताना किरण निंबाळकर म्हणाले कि, सातारा जिल्ह्याचे राजकारणामध्ये ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कायमच केंद्रस्थानी आहेत आणि आगामी काळामध्ये सुद्धा तेच राहणार आहेत. आपल्या पेक्षा जेष्ठ नेत्याबद्दल बोलताना निदान वयाचा विचार करून तरी टीका करावी. आगामी काळामध्ये आमचे नेते ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबद्दल कोणीही काहीही बोलले तर आम्ही समर्थक शांत बसणार नाही, असा इशारा सुद्धा यावेळी किरण निंबाळकर यांनी दिला.