पंढरपूर पुलाला झुडपांचा विळखा; झुडपे काढण्याची वाहनचालकांची मागणी


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । कोळकी । फलटणवरून पंढरपूर कडे जाताना असणाऱ्या नीरा उजव्या कालव्यावरील नव्या व जुन्या पुलावर झाडी व झुडपांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. यामुळे वाहनचालकांना नेमकेपणाने पुलाचा अंदाज येत नसून या ठिकाणी अपघात होण्याची श्यकता निर्माण झालेली आहे. फलटण तालुक्यातील कारखाने सुरु झाल्याने उसाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सदरील रोडवरून होत आहे. तरी तातडीची उपाययोजना म्हणून संबंधित विभागाने सदरील पुलावरील झाडी व झुडपे काढावित अशी मागणी वाहनचालकांच्या मधून होत आहे. सदरील दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूना खड्डे व मोठाली भगदाडे पडलेली आहेत. हे खड्डे व भगदाडे सुद्धा बुजवणे गरजेचे असल्याचे मत दुचाकी वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!