जे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, ते आता केंद्राच नेतृत्व करायला निघालेत : आमदार चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 07 डिसेंबर 2021 । फलटण । राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. ह्या सरकारमध्ये असलेले नेतेमंडळी हे खुर्ची टिकवण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. त्यामध्ये संजय राऊत हे डबल ढोलकी आहेत. संजय राऊत हे मुंबईमध्ये ममता बॅनर्जी आल्या कि त्यांच्या सारख्या बोलतात तर दिल्ली मध्ये सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी जरा डोळे वठारले कि, लगेच त्यांच्यासारखे बोलतात. आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत ते आता केंद्राच नेतृत्व करायला निघाले आहेत, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

फलटण येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, समाधान आवताडे, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले कि, भारतीय जनता पार्टीचा आत्मा हा म्हणजे संपर्क कार्यालय आहे. सदर कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये फलटण संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नक्कीच कामकाज सुरू राहील. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कसे निवडून येणार नाहीत, या बाबत चेष्टा करत होते. राष्ट्रवादीने माढ्याची खासदारकी साठी गृहीत धरलेली जागा अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत.

संपर्क कार्यालय नुसतं सुरू होऊन उपयोग नाही, तर कार्यालय जिवंत ठेवणे गरजेचे आहे. कार्यालय हे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वानांच प्रेमळ वाटले पाहिजे. कार्यकर्त्यांनी पुढच्या नागरिकांचे अडचण ऐकून लिहून घेतली पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान आपल्या देशाला पुन्हा मिळणे नाही. मोदींजींनी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी खूप बारकाईने नियोजन केलेले आहे. 2024 पर्यंत देशातील शेवटच्या घरापर्यंत नळकनेक्शन द्वारे पाण्याची वाटप होईल. या सोबतच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

ओबीसी आरक्षण कधी गेलं, हे सुद्धा या सरकारला कळलंच नाही. निरोगी माणूस कधीच म्हणत नाही, की मी निरोगी आहे. आज देवेंद्रजी जेवढं फिरतात त्याच्या 1% सुद्धा आताच्या मुख्यमंत्र्यांनी फिरून दाखवावं. कोरोनामध्ये राज्याला सर्वतोपरी मदत हि केंद्र सरकारनेच मदत केली. भारतीय जनता पार्टीच्या जीवावर 18 खासदार निवडून आलेल्या नेत्यांनी विनाकारण टीका करून उपयोग नाही. गेल्या वर्षा दोन वर्षांमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात व वर्षा बंगल्यावर सुद्धा गेले नाहीत. जर कोणाला काशीला यात्रेला जायचं असेल तर त्याने सतत म्हणावं कि मला काशीला जायचं आहे, मला काशीला जायचं आहे. त्याच प्रमाणे शरद पवार तर कायमच पंतप्रधान होत आहेत, असा टोलाही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

फलटणमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा फलटणमध्ये भव्य – दिव्य सत्कार करण्याची मी वाट पाहत आहे. आगामी काळामध्ये अशी संधी लवकरात लवकर मिळो, हीच प्रार्थना मी कायम विठुरायाकडे करीत आहे. फलटण तालुक्यामध्ये आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ताकतीने लढून फलटण तालुक्यावर भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल, असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कार्यालय सुरू करणे ही आमची सर्वांची इच्छा होती. आपण सुरू केलेल्या कार्यालयाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्घाटन करत आहे. हाच आमचा मोठा आनंद आहे. आज ज्यांचे प्रवेश झाले त्या सर्वांचे भाजपा मध्ये स्वागत. फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना एकत्र बसून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदरील कार्यालय सुरू केलेले आहे. फलटण तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत कामकाज करण्यासाठी ह्या कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या शेवटच्या कार्यकर्त्यामुळे मी खासदार झालेलो आहे. गोरगरीब नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण कार्यरत राहणे गरजेचे आहे. पक्षाचा कार्यकर्ता कधीही पगारी नसतो. त्यामुळे त्याला योग्य तो मान सन्मान आपण ह्या कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज करीत राहणार आहे. नगरपालिकेमध्ये बऱ्याच बुरुजाच्या भिंती आपण तोडलेल्या आहेत. आगामी काळामध्ये नगरपालिकेमध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. हाच नाईक निंबाळकर फलटणची घडी व्यवस्थित बसवणार आहे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी भारतीय जनता पार्टी आगामी काळामध्ये फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये नक्कीच भाजपाचा झेंडा फडकवेल, अशी खात्री यावेळी व्यक्त केली.

संघटन बांधणी करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे मत आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केले. प्रसाद पवार – पाटील व सागर शहा यांच्यासह विविध कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश यावेळी करण्यात आला.

….. तर अनुप शहा भावी नगराध्यक्ष : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
फलटण नगरपरिषदेवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सत्तांतर होईल. त्यावेळी नगरसेवक, विरोधी पक्ष नेते असा प्रवास केलेले आमचे अनुप शहा हे नगराध्यक्ष नक्कीच होतील, अशी खात्री सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!