दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2023 | फलटण | सातारा जिल्हा परिषद सातारा व फलटण पंचायत समिती फलटण आणि सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह काँन्व्हेंट स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज गुणवरे यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे ता. फलटण येथे २० डिसेंबर ते २२ डिसेंबर अखेर होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ व सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
३ दिवस चालणाऱ्या तालुकास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि. २० डिसेंबर रोजी दुपारी १ वा. फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या शुभहस्ते होणार असून याप्रसंगी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, सरस्वती शिक्षण संस्थेचे संचालिका सौ. प्रियांका पवार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
दि. २१ डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी उपकरणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या शुभहस्ते व शिक्षण विस्तार अधिकारी मठपती व शिक्षण विस्तार अधिकारी दारासिंग निकाळजे, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका पवार, फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली चोरमले यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ व समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्व शाळांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपकरणासह वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ व सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विशाल पवार यांनी केले आहे. या प्रदर्शनाला जवळपास 200 शाळा उपस्थित राहतील.