स्थैर्य, सातारा, दि. 30 : करोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. त्याचे सावट येणार्या गणेशोत्सवावरही आहे .सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा की नाही याबाबत शासन निर्णय घेईल .त्यापूर्वी जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे व मूर्तिकारांची बैठक घेऊन उत्सवाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल मूर्तिकारांनी ही यंदा कमी उंचीच्या व शाडूच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन सातारचे अतिरिक्त उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील. माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे, राजू गोडसे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे यांच्यासह गणेश मूर्तिकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की करण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत .त्यामुळे गणेशोत्सव व्यापक स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन सध्या तरी कोणी करू नये. शासनाने उत्सवावर निर्बंध लावल्यास मंडळाचे ,मूर्तिकारांचे कष्ट वाया जातील .संचारबंदी, सोशल डिस्टन्स ,सुरक्षितता आदी नियमांचे उत्सवात पालन होणार नाही. त्यामुळे त्यामुळे गणेश मंडळी मूर्तिकारांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल मूर्तिकारांना यंदा कमी उंचीच्या व शाडूच्या गणेश मूर्तींना प्राधान्य द्यावे यावेळी राजू गोडसे म्हणाले की वीस ते पंचवीस गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले आहे या बैठकीत मूर्तिकारांनी ही गणेशोत्सवा बाबत आपल्या काही सूचना मांडल्या.