दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑक्टोबर २०२२ । पुणे । सत्यशोधक महासभा प्रबोधन सभे तर्फे दरवर्षी प्रमाणे समता भुमी वरील महात्मा फुले वाड्यात विश्व सम्राट बळीराजाची मिरवणूक बलिप्रतिपदादिनी काढण्यात आली यंदाचे २० वे वर्ष होते.
यावेळी प्रथम सामाजिक कार्यकर्ते रोहिदास तोडकर व राजेंद्र शेलार यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर जेष्ठ समाजसेवक अंकल सोनवणे यांचे शुभहस्ते विश्वसम्राट बळीराजाला पुष्पहार घालण्यात आला. बळीराजाच्या भूमिकेत फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक होते.
यावेळी बळीराजा गौरव महोत्सव समिती मिरवणुकीच्या आयोजिक प्रा.प्रतिमा परदेशी म्हणाल्या की बळीराजाच्या काळात शेतकऱ्या वर संकट आले तर तगाई स्वरूपात मदत करून शेतकऱ्यांना आधार देत होते . परतीच्या पावसाने ऐन दिवाळीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पिकांची नासाडी केली तरी सरकारने अजूनही मदत केली नाही हे दुर्दैव्य आहे.
यावेळी बळीराजा वेशभूषेत ढोक म्हणाले की कोणतेच सरकार शेतकरी हिताचे काम करीत नसून कायम अन्याय करीत आला आहे.
ऍड.मोहन वाडेकर म्हणाले की सरकार शेतकरी मालाला योग्य भाव देत नसून अतिरिक्त पावसाने शेतीचे नुकसान झाले त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांना अडचणीची ठरली आहे. पुढे म्हणाले की आपली बळीराजा मिरवणूक घोड्यावरून वाजत गाजत काढावी.
लाल महालात बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी बळीराजा वेशभूषेत आणि समय्यक शेलार यांनी महात्मा फुले वेशभूषेत पुष्पहार अर्पण केला. समारोप प्रसंगी बाल कलाकार संकल्प गायकवाड याने मी ज्योतिराव बोलतोय एकपात्री प्रयोग सादर करून त्याने सर्वांकडून उद्देशिका वदवून घेतली तर आयोजिका प्रा.प्रतिमा परदेशी यांनी सत्याचा अखंड गाऊन समारोप केला.
या वेळी किशोर ढमाले ,संतोष शिंदे आशा ढोक अनेक मान्यवार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मोलाची मदत वामन वळवी, आकाश- क्षितिज ढोक , शिल्पा शिरवनकर,नाथा परदेशी यांनी केली.
बळीराजाचा जयघोष ईडा पीडा टळू दे बळीराजाच राज्य येऊ दे* हा जयघोष व महापुरुषांचे नावांनच्या घोषणानी फुले वाडा ते लाल महाल मिरवणूक दरम्यान घुमघुमला होता.यावेळी मान्यवरांचे कृषिधनाने स्वागत केले तर बळीराजाच्या हस्ते सर्वाना कृषिधन,फळभाज्याचे वाटप करण्यात आले.
तर आभारप्रदर्शन रोहिदास तोडकर यांनी मानले.यावेळी सत्यशोधक चळवळीचे जेष्ठ ,तरुण कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.तर दिवाळी निमित्त नागपूर व इतरत्र ठिकाणावरून आलेल्या कुटुंबांनी लाल महालात विश्व सम्राट बळीराजा सोबत अनेकांनी फोटो काढले.