सत्तेचा उतमात करून उधळपट्टी केल्यानेच किसनवीर वर ही वेळ – सैारभ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२१ । कुडाळ । प्रतापगड किसनवीरच्या कराराचे तुनतुने वाजवता मग त्यातील अटींचे आपण पालन केले का असा सवाल करित कारखाना चालवायला घेताना 51.40 कोटींची जबाबदारी असताना आठ वर्षांत अद्यापही 8 कोटींचे देणे बाकी ठेवले आहे या शिवाय कारखान्याच्या मालमत्तेवर आणखी सिंधूदूर्ग बँकेचे 40 कोटींचे कर्ज वाढवून ठेवले आहे, किसनवीर व खंडाळा कारखाना ब्लँक लिस्ट मध्ये घालवला या यादीत प्रतापगडचे नाव नाही यावरुनच ढिसाळ नियोजन कुणाचे हे स्पष्ट होते. असा घाणाघात करून आत्तापर्यत सत्तेचा उतमात करून शेतकरी सभासदांच्या पैशाचा उधळपट्टी करताना नटनट्यांची व सेलिब्रिटींची उठाठेव करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत बसला नसता तर ही किसनवीरच्या प्रशासनावर ही वेळ आली नसती असा सणसणीत टोलाही प्रतापगड कारखान्याचे संचालक व जावळीचे उपसभापती सैारभ शिंदे यांनी माजी आमदार मदन भोसले यांच्यावर प्रतिउत्तर देताना लगावला.

किसनवीर कारखान्याच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन प्रतापगड कारखान्याच्या व्यवस्थापनावर केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी कुडाळ ता.जावळी येथे प्रतापगडच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले, किसनवीरने शेतकरी सभासदांच्या ऊसाचे पैसे एपआरपी प्रमाणे अद्याप दिले नाहीत. तसेच कारखाना करारावेळी प्रतापगडचे कामगार यादीत असतानाही त्यांना किसनवीर व्यवस्थापनाने सिझनल ठेवले. प्रतापगडच्या कामगारांचे चैादा महिन्यांचे वेतन दिले नाही, आठ वर्षांचा लेखाजोखा करायचाच असेल तर जाहीरपणे करण्यास माझी तयारी आहे, असे आवाहन करत प्रतापगडमध्ये किसनवीरने कोणतीही गुंतवणूक केली नाही, उलट कारखान्यावर आणखी कर्ज वाढवून ठेवले आहे.

प्रतापगड चालवायला घेतला ही चूक असेल तर तो आमच्या व्यवस्थापनाला परत द्यावा व स्वताची चुक सुधारावी, स्वतःची अकार्यक्षमता आमच्या माथी मारु नये. आम्ही त्रास दिला म्हणून प्रतापगड चालला नाही, म्हणता मग खंडाळा व किसनवीर कारखान्यांचे गाळप एवढे कमी का झाले, याचे उत्तर द्यावे, ज्यांनी ऊस दिला त्यांचे बील अजुनही दिले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले. किसनवीरवर बोजा किती यांच्याशी प्रतापगडचे देणे घेणे नाही. आम्ही कोणत्याही विषयावर उघड बोलण्यास तयार आहे तुमची तयारी असल्यास जाहीरपणे व्यासपिठावार यावे, अन्यथा असली भोंदूगिरी बंद करावी.

52 हजार सभासद शेतकर्‍यांच्या चुली बंद करणार्‍यांनी शेतकर्‍यांचा कैवारी असल्याचा फुकटचा आव आणू नये, कोणताही कारखाना बंद ठेवणे हे शेतकर्‍यांवर अन्यायच म्हणूनच आमचा कारखाना आमच्या ताब्यात द्या, कामगारांचे जवळपास 9 कोटी थकीत असून, प्रतापगडची वीजबील थकल्यामुळे वीजही कट करण्याची नामुष्की किसनवीरमुळे ओढवली आहे. अंगलट येणार्‍या मुद्दयांवर लवादाच्या आड लपायचे आता सोडून द्यावे व वस्तुस्थिती मान्य करून स्वतःचा नाकर्तेपणा आता मान्य करावा, असा घाणाघाती टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. यावेळी पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे, संचालक मालोजीराव शिंदे, बाळासाहेब निकम, प्रदीप तरडे, उत्तम पवार, नारायण पाटील आदी उपस्तित होते.


Back to top button
Don`t copy text!