स्थैर्य, दि.१४: जगभरात गूगलच्या अनेक
सर्व्हिसेस सोमवारी संध्याकाळी 40 मिनीटांपर्यंत बंद पडल्या होत्या. लॉगइन
आणि अॅक्सेसमध्ये अडचणी येत होत्या. भारतीय वेळेनुसार, सोमवारी संध्याकाळी
5.26 वाजेपासून 6.06 पर्यंत सर्व सर्व्हिस क्रॅश होत्या. गूगलकडून याबाबत
कोणतेही स्पष्टीकरण आले नाही.
या सर्व्हिस बंद होत्या
जीमेल,
यूट्यूब, कॅलेंडर, ड्राइव, डॉक्स, शीट्स, स्लाइड्स, साइट्स, ग्रुप्स,
हँगआउट्स, चॅट, मीट, वॉल्ट, करन्ट्स, फॉर्म्स, क्लाउड सर्च, कीप, टास्क,
वॉइस.
या सर्व्हिस सुरू होत्या
गूगल सर्च इंजिन आणि मॅप.
जीमेलचे 180 कोटी यूजर
जगभरात
जीमेलचे अंदाजे 180 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. 2020 मध्ये दररोज
306.4 बिलियन ईमेल सेंड आणि रिसीव्ड झाले आहेत. तसेच,यूट्यूबचे 200
कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत.