राजुरी येथे कापड दुकान चोरट्यांनी फोडले; सुमारे १ लाख ३ हजारांचे कापड लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) येथील कुरवली चौक असणार्‍या शिवतारा कलेशन नावाचे कापड दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे १,०२,७४९ रुपये किमतीचा कपड्यांचा माल लंपास केला असून या चोरी प्रकरणी कापड दुकानाचे मालक सूरज धनाजी जाधव (रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या चोरीची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ जानेवारी रोजी रात्री ७.३० ते दि. १८ जानेवारीच्या सकाळी ९.०० वाजण्याच्या दरम्यान कुरवली चौक, राजुरी येथील शिवतारा कलेक्शन नावाच्या दुकानाचा पत्रा कापून आत प्रवेश करत दुकानातील एकूण १,०२,७४९ रुपये किमतीचे वर्णनाचे कपडे त्यामध्ये ३१,८०३ रुपये सुचित्रा, मंगलम, देवी सिल्क, श्रीवल्ली, चित्रकला, काचीपुरम सिल्क, अशा विविध कंपनीच्या एकूण ४७ साड्या, १०,११३ रुपये विविध कंपन्यांचे ब्लाऊज पीस, ११,३७२ रूपयांचा शूटिंग कपडा तागा, ११,५४५ रूपयांच्या जीन्स पॅन्ट, १६,००० रूपयांची मुला-मुलींचे रेडीमेड ड्रेस व १९,५१६ रूपयांचे रेडिमेड शर्ट तसेच २,४०० रूपयांचे टॉवेल अशा वर्णनाचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. हवा. चांगण करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!