वरकुटे येथे चोरांचा उच्छाद


दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । वरकुटे । येथे रविवारी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान अज्ञात चोरांनी तीन घरे फोडून लाखोंचा वज कंपास केला आहे. वरकुटे येथील काटकरवस्तीवरील तानाजी माने, वरकुटे गावातील सेवानिवृत्त सनिक पांडुरंग केरु माने व विलास केरु माने यांची घरे चोरांनी घरात कोणी नसल्याचे पाहुन फोडली. घरे फोडुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
भरदुपारी झालेल्या या चोर्‍यांनी परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून न शेतकामानिमित्ताने घर बंद करुन बाहेर पडणेही आता मुश्किल होऊन बसले आहे.

वरकुटे येथील पोलीस पाटील अंकुश माने यांनी म्हसवड पोलिस स्टेशनला फोन करून माहीती दिली. सायकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.


Back to top button
Don`t copy text!