एमआयडीसीतील भंगार चोरून ती कंगाल करत चोरटे होत आहेत मालामाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 23 : सातारा एमआयडीसी अनेक अडचणींना सामारे जात असताना तिला ऊर्जीत अवस्थेत आणण्यासाठी कोणी लक्ष देत नाही. उलट बंद असलेल्या कंपनीतून भंगार चोरून विकण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे परजिल्हयातील भंगार व्यवसायिकांनी एमआयडीसी परिसरात बस्तान चांगलेच चर्चेत येऊ लागले आहे. ना घेताना ना देताना पावतीचं नाही, यामुळे चोरीचा माल कमी किंमतीत घेऊन ही मंडळी मालामाल होत आहे. आधीच डबघाईला आणि त्यात भंगार चोरटयांचा त्रास सुरू असून यावर एमआयडीसी प्रशासन, पोलीस, मास यांनी काही तर चाप बसविण्याची वेळ आली आहे. अन्यथा एमआयडीसीतील भंगार चोरून ती कंगाल करत चोरटे होत आहेत मालामाल. 

करोनाची धास्ती वाढत असताना सातारा एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी कामगारांना सुट्टी देत प्रादुभाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली. मात्र याचा भंगार चोरटयानी पुरेपुर फायदा उठवत बंद कंपन्यातून भंगार चोरण्याचा सपाटा लावला होता. भंगार घेता देता पावती नसल्याने, कुठून आणले याची विचारणा होत नसल्याने चोरटयाकडून कमी दरात घेत व्यवसायिक सुध्दा मालामाल झाले आहेत. सध्या एमआयडीसी परिसरात अनेक भंगार व्यवसाय नव्याने सुरू झाले. परजिल्हयातील सुध्दा आलेल्या काही जणांनी भाडेतत्वावर जागा घेत व्यवसाय सुरू केला असून त्यात आता काही जणांनी गुंतवणूक केली आहे.

पोलीसांनी अचानक या भंगार गोडावूनची पाहणी केल्यास संबंधित माल कोणाकडून घेतला अशी वरचेवर विचारणा केली पाहिजे. प्रत्यक्षात तसे होत नाही, विचारणारे कोणी नसल्याने चोरटयाकडून येणारा माल मोठया प्रमाणावर असल्याने ही दुकानदारी बीनभोबाट जोरात सुरू आहे. हे असेच सुरू राहिले तर भंगार चोरीचे प्रमाण अधिक वाढणार आहे.

चोरटयाकडून घेतलेला माल त्याच दिवशी विल्हेवाट लावला जात असल्याचे समजते. या परिसरात 12 हून अधिकजण हा व्यवसाय करतात. यात वाहनांचे स्पेअरपार्ट सुध्दा घेताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वाहन, इंजीनची स्क्रॅप ऑर्डर आहे कि नाही याची खातर जमा न करताच घेऊन ते तोडून विल्हेवाट लावली जाते.एमआयडीसी प्रशासन, पोलीस, मास यांनी याबाबत कडक चाप बसविण्यासाठी काही तरी तत्काळ करण्याची वेळ आली आहे. अन्यथा चोरटयाकडून एमआयडीसीतील बंद आणि चालू कंपन्यातील लुटालुट अशीच सुरू राहून एमआयडीसी कंगाल होत चोरटयांची चंगळ होईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!