घरासमोर रांगोळीसाठी जागा नाही ? का रांगोळी काढता येत नाही ?; तर हि बातमी नक्की वाचा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आता अगदी फलटणसारख्या ठिकाणी सुद्धा फ्लॅट सिस्टीम मध्ये हजारो नागरिक राहत आहेत. त्यामुळे घरासमोर अंगण बघायला सुद्धा मिळत नाही. त्यामध्ये आताच्या सर्वच महिला ह्या नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडत असतात. त्यामुळे दररोज उठून रांगोळी काढणे हे आता शक्य होत नाही. यासोबतच बदललेल्या शैक्षणिक पद्धतीच्यामुळे मुलींना रांगोळी काढता येतेच असे नाही, त्याची सुद्धा अनेक कारणे आहेत. आता शिक्षणाच्या पद्धती संपूर्णरीत्या बदलल्या आहेत. त्यामध्ये आता पारंपरिक शिक्षण घेतले तर कुठेही नोकरी मिळणे किंवा व्यवसाय करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता विणकाम करणे, रांगोळी काढणे या कला आता कालबाह्य होत चाललेल्या आहेत.

या सर्व झंझटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही एक जालीम उपाय शोधला आहे. तो म्हणजे आम्ही तुम्हाला एक आर्टिफिशीयल रांगोळी तयार करून देऊ, ते सुद्धा अगदी हॉटेलमधील एकवेळच्या नाष्ट्याच्या किमतीमध्ये!

आता तुम्ही म्हणाल कि, हि रांगोळी घेऊन आम्ही काय करायचं ? तर पुढे वाचा,

रांगोळी देवासमोर, घरासमोर असणे हे शुभप्रतिक मानले जाते. त्यामुळे आपल्या देवांच्या समोर, घराच्या समोर रांगोळी असणे हे महत्वाचे आहे. रांगोळी घरासमोर असल्याने घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करीत नाहीत, अशी माहिती तुमची आमची आजी नेहमी आपल्याला देत असणार.

या सर्व बाबींचा विचार करून आम्ही देवासमोर, घरासमोर ठेवता येईल अशी आर्टिफिशिअल रांगोळी शीट तयार केली आहे. त्यावर पाणी पडले तरी काही होत नाही. अगदी तुम्ही ती रांगोळी ओल्या फडक्याने पुसून सुद्धा घेऊ शकता.

चला तर मग उचला तुमचा मोबाईल आणि द्या रांगोळीची ऑर्डर; हो ऑर्डर देताना लक्षात ठेवा कि, तुम्ही तुमचे पेमेंट पाठवले कि नंतर मगच तुमची ऑर्डर तुम्हाला मिळेल. जर तुम्ही फलटण येथे राहात असाल तर तुम्हाला फलटण येथे ऑर्डर मिळेल, अन्यथा तुम्ही आम्हाला ऑर्डरसोबत पोस्टाचे पैसे सुद्धा द्या; तुम्हाला तुमची ऑर्डर ही घरपोहोच येईल.

चला तर मग उचला फोन आणि करा फोन 9359331717 या नंबरवर…


Back to top button
Don`t copy text!