ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही; फलटणमध्ये मराठ्यांचा निर्धार; थेट मुंबईत धडक


दैनिक स्थैर्य | दि. 03 जानेवारी 2023 | फलटण | फलटणमध्ये दिला मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीतून मराठयांनी चलो मुंबईचा नारा दिला असून मुंबईतील उपोषणाला जाण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. मनोज जरांगे – पाटील यांना भेटण्यासाठी जाणार लाखो बांधव जाणार असून ओबीसीतून आरक्षण मिळालेशिवाय माघार नाही असा निश्चय केला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असून मला भेटण्यासाठी मराठा समाजाने यावे; असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत “चलो मुंबई, चलो मुंबई”चा नारा मराठा क्रांती मोर्चा फलटणने दिला आहे. मुंबईला जाण्याच्या तयारीची आज फलटण येथे नियोजन बैठक झाली असून संपूर्ण फलटण तालुक्यातील मराठा बांधव मुंबईला हजारोंच्या जाणार आहेत.

मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील हे 20 जानेवारीला आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असून त्यांच्या भेटीला फलटण तालुक्यातील मराठा बांधव आपल्या ट्रॅक्टर, ट्रॉलीसह टेंपो व ट्रकसह आदेश येताच रवाना होणार आहेत. फलटण तालुक्यातील सात जिल्हा परिषदेच्या गटातील प्रत्येक गावातील मराठा बांधव हे मुंबईतील उपोषणात सहभागी होणार असून त्या संदर्भात मुख्य समन्वयक हे गावागावात भेट देणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!