दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । सातारा । शंकर माळवदे हे जयभवानी सहकारी पतसंस्थेचे सभासद नाहीत. त्यांनी 1 कोटी रूपयांची कर्जे शिफारस करून ती देण्यास भाग पाडले आहे शिवाय शिफारस केलेली ही कर्जे थकीत गेल्याने वसूल करू नये म्हणून माळवदे थकीत कर्जदारांना चिथावणी देत आहेत. संस्थेत कोणताही अपहार किंवा अफरातफर झाल्यासंबधी ऑडीट अहवालात निष्कर्ष नाहीत. जयभवानी सहकारी संस्था व सहकार खात्याविरूध्द केलेल्या सर्व तक्रारी वरिष्ठ कोर्टाने चौकशी करून रद्द केल्या आहेत, असा खुलासा जयभवानी पतसंस्थेचे चेअरमन अॅड. विलास आंबेकर यांनी केला आहे.
अॅड. आंबेकर यांनी दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, संस्थेविरूध्द टेस्ट ऑडीट व कलम 83 ची चौकशी रद्द केली आहे. संस्थेची बदनामी होईल अशी वर्तणूक आणि मजकूर प्रसिध्द केल्याने त्यांचे सभासदत्व रद्द केले आहेत. त्यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या प्रस्तावास सहकार खात्याने चौकशी करणेसाठीचा संस्थेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सहकार खात्याच्या अधिकार्यांविरुद्ध केलेल्या खोट्या फिर्यादी काढून घेतल्याबद्दल सह. जिल्हा न्यायाधिश यांनी दंडाची रक्कम देण्याचा हुकूम केलेला आहे. संस्थेने माळवदे यांच्याविरुद्ध बदनामी केल्याबद्दल पूर्वीच नोटीस देवून कार्यवाही सरू केली आहे.
आंबेकर यांनी विकसीत केलेल्या मिळकतीत माळवदे यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहे. त्याबाबत नगरपालिका आयुक्त (पुणे) यांनी त्यांच्याविरूध्द कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे चिडून जावून जयभवानी नागरी संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने ब्लॅकमेलिंग करण्यासाठी तक्रारी सुरू केल्या आहेत. माळवदे हे माहिती अधिकाराची भीती दाखवून शासकीय अधिकार्यांना ब्लॅकमेल करत असतात. त्याबाबत कागदोपत्री पुराव्यासह खुलासा व बदनामीची पोलखोल येत्या काही दिवसांत संस्था आणि लोकांसमोर करणार असल्याचेही अॅड. विलास आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माळवदे यांनी आंबेकरांबद्दल चुकीचा मजकूर प्रसिद्ध करून बदनामी केली असल्याचेही याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.