दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवून येणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत या कारणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वास्तविक सातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय आहे अशी अफवा पसरली होती सातारा पोलीस दलामार्फत त्याची शहनिशा करण्यात आली मात्र ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी असले बाबत जर कोणी जाणीवपूर्वक सदरची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात या इशारा सातारा पोलिसांनी दिला आहे जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याकरिता सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज आहे नागरिकांच्या सुरक्षिततेचे सर्वतोपरी प्रयत्न जिल्हा पोलीस दलामार्फत केले जात आहे नागरिकांनी अशा स्वरूपाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
परिसरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती संशयित व्यक्ती आढळल्यास तर तत्काळ स्थानिक पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा सातारा नियंत्रण कक्ष किंवा 112 येथे संपर्क साधावा स्वतः कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केली आहे.