जीवनात तारतम्य हवेच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


कौटुंबिक जीवनात आपणाला अनेक गोष्टीशी मिळते जुळते घेऊन वावरावे लागते.तडजोड हाच खरा कौटुंबिक आधार आहे. मानवी जीवनात तुमचा आमचा वेगवेगळ्या क्षेत्रात संबंध येतो. पण या क्षेत्राशी संबंधित जे तारतम्य आहे हे कसं सांभाळायचं या बाबतीत आपण अनभिज्ञ असतो. ते आपल्या लक्षात आले म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी वाटचाल करु शकतो. याबाबतीत असलेले ‘तारतम्य’ राष्ट्रसंतानी अगदी आवर्जुन सांगितले आहे.

भांड्याला भांड लागते. आवाज होतात.क्लेश होतात.मानापमान होतं.थोडी सोशिक वृत्ती हवी. त्यातूनच संवादाचे नांते हळूवारपणे जपणे .प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तींचा सुसंवाद असणे हे तारतम्य सांभाळणे ही आजच्या काळाची सर्वाधिक गरज आहे. कोणाच्याही कुटुंबात सर्वच सदस्य खराब नसतात. तर त्यांच्यामध्ये असलेल्या चांगुलपणाचे जर भान करुन दिले तर घराचं घरपण टिकवणे सहज शक्य आहे. काही काळापूर्वी झोपडीच्या घरात लोक गुण्यागोविंदाने जीवन जगत होते. आज गगनचुंबी इमारतीत सर्व वैभव अनुकुल असतानाही समाधान मात्र दिसत नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज कौटुंबिक संवाद लोप पावला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आज एकत्र बसण्याची नितांत गरज आहे. एकमेकाच्या विचाराची देवाण घेवाण, कुटुंबाची मिळकत, अपेक्षित खर्च, इतर काही समस्या यावर एकत्रित बसून जर चर्चा झाली तर प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव निर्माण होईल व घरगुती एकोपा त्यातून साधला जाईल. त्याकरीता प्रत्येक घरात किमान महिन्यातून एकदा तरी एकत्र बसणे गरजेचे आहे. तरंच आपल्या घराचे घरपण आपण कायम टिकवून ठेवू शकतो. आपल्या पुढील पिढीसमोर चांगला आदर्श निर्माण करू शकतो.

घर नुसतं मोठे असून चालत नाही. त्यातील सदस्यांचे ममानसिकता सकारात्मक असावी. घराचे घरपण हरवून बसलो तर सर्वच गमावले. आजच्या परिस्थितीत घराचं घरपण हरवल्या सारखं आहे. काही दिवसा अगोदर प्रत्येक गावाला गावपण होतं.ते आता अदृश्य झालं आहे. ज्या गावात आपलं घर आहे त्या घरात बसून हजारो कि.मी. अंतरावरचं संगीत आपण ऐकतो. पण ज्या दिवशी आपल्या कुटुंबातील सभासदांच्या अंतर मनातील स्वर आपल्याला ऐकू येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनाचे तारतम्य आपल्या लक्षात येईल. असं तारतम्य असणं हेच आपल्या सुखी, समृद्ध जीवनाची गुरूकिल्ली आहे.

आई जगदंबेचा जागर हाच सूचित करतो की वेगवेगळ्या प्रकाराचे धान्य एकाच भूमीत गुण्यागोविंदाने नांदत असते.आपण सुदिक सा-या प्रकाराच्या स्वभावातील कुटुंब सदस्यांशी जुळवणे घेणं. हाच खरा कुलाचार आहे.

आपलाच तारतम्य सदस्य ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!