राजुरी मध्ये कोणताही पाॅझिटीव्ह रुग्ण नाही; टायपिंग मिस्टेक मुळे फलटण तालुक्यातील राजुरी गावात गोंधळ


स्थैर्य, फलटण : नुकत्याच आलेल्या रिपोर्ट मध्ये टायपिंग मिस्टेक मुळे फलटण तालुक्यातील राजुरी गावात गोंधळ उडाला होता. फलटण तालुक्यातील आलेल्या गावांचा रिपोर्ट मध्ये राजुपरी गावाचा उल्लेख झाला आहे. सदरचे राजुपरी हे गाव फलटण तालुक्यात नाही तसेच या नावाला अनुसरुन राजुरी हे गाव असल्याने सर्वांचा समज राजुरी येथे एक पाॅझिटीव्ह रुग्ण सापडला असा झाला आहे. सद्य परिस्थितीत राजुरी मध्ये कोणताही पाॅझिटीव्ह रुग्ण नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जावू नये. तसेच कोणतीही अफवा पसरवून नये. प्रशासनास सहकार्य करावे. कामा शिवाय घरातून बाहेर पडू नये, मास्क चा वापर करावा, हात साबणाने स्वच्छ धुवावेत तसेच कामानिमित्त जर बाहेर असाल तर सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करावेत, असे आवाहन राजुरी कोरोना कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!