
दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । चिमणगाव मध्ये दोन लाखांची चोरी झाल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिमणगाव, तालुका कोरेगाव च्या हद्दीत आटाळी शिवारात संदीप तानाजी जाधव वय 45 यांच्या राहत्या घरी त्यांनी दरवाज्याला कडी लावली नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने स्वयंपाक घरातील सुटकेस मध्ये ठेवलेले 2 लाख 7 हजार रुपये किंमतीचे दागिने रोख रक्कम व मोबाईल लंपास केला. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.