दैनिक स्थैर्य | दि. ३ मे २०२३ | फलटण |
भाडळी खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. ०१ जानेवारी २०२३ ते दि. २ मे २०२३ रोजीच्या सकाळी १०.०० वाजण्याच्या दरम्यान टाटा हिताचे कंपनीच्या पोकलेन मशीनची चोरी झाल्याची फिर्याद सनी लक्ष्मण कदम (रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी, लक्ष्मीनगर, फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या चोरीची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, भाडळी खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. ०१ जानेवारी २०२३ ते दि. २ मे २०२३ रोजीच्या सकाळी १०.०० वाजण्याच्या दरम्यान सचिन विनायक बोके यांच्या शेतात उभा केलेला पोकलेन २ मे रोजी तेथे आढळून आला नाही. म्हणून सचिन बोके यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे करत आहेत.