फलटणच्या बारस्कर गल्लीत चोरी; सुमारे ९२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास


दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण |
बारस्कर गल्ली, फलटण येथे एका घरातील हॉलमधील कपाटात ठेवलेले सुमारे ९२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि. ९ मार्च ते २४ एप्रिल दरम्यान सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची फिर्याद फलटण शहर पोलिसात उर्मिला रामराव पेंदाम (राहणार बारस्कर गल्ली, फलटण) यांनी दिली.

या चोरीची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बारस्कर गल्ली, फलटण येथील फिर्यादी उर्मिला पेंदाम यांच्या राहत्या घराच्या हॉलमधील गोदरेजच्या उघड्या कपाटात ठेवलेले दागिने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरून नेले. यामध्ये २२ हजारांचे साखळीतले सोन्याचे व काळे मणी तसेच दोन वाटया असलेली ११ ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र, ३० हजारांचे एक दीड तोळा वजनाचा गळ्यातील डिझाईनचा नेकलेस, २० हजारांचा एक तोळा वजनाचा गळ्यातील लक्ष्मीहार, ६ हजारांचे कानातले गोल आकाराचे टॉप्स, १० हजारांचे एक वेढण्याची पाच ग्रॅम वजनाची अंगठी, ४ हजारांची एक दोन ग्रॅम वजनाची ठोक्याची डिझाईन असलेली अंगठी, असा एकूण ९२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

या चोरीचा अधिक तपास पो. ना. घाडगे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!