सारोळा पुलावरून पडून युवक बेपत्ता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, खंडाळा, दि. १२ : शिरवळ येथील जिल्हा चेक नाक्यावरील सारोळा पुलावरुन पडून युवक बेपत्ता झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  शिरवळ पोलिस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्याकडून नदीमध्ये शोधकार्य सुरु आहे.दशरथ सिंग अमरसिंग सिंग (वय 18, राजस्थान ) असे पाण्यात पडलेल्या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री मध्यरात्रीनंतर दशरथ सिंग व त्याचा भाऊ मित्रांसमवेत बेंगलोर येथे चालले होते.शिरवळ येथील जिल्हा चेक नाक्यावर थांबल्यानंतर दशरथ उलटी होत होती त्यावेळी त्याने गाडीतून उतरून गाडीच्या मागे जाऊन उलटी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो परत आला नाही म्हणून त्याचे भाऊ व मित्रांनी दशरथ याचा शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दशरथची चप्पल नदी पाण्यात तरंगताना दिसली त्यावेळी त्याचा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र दशरथ मिळून आला नाही.

पावसामुळे व वीर धरणाचे फुगवठ्यामुळे नीरा नदीचे पात्र विस्तीर्ण आहे त्यामुळे या फुगवट्याच्या पाण्यात शोधणे अशक्य झाल्यामुळे शिरवळ पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी दशरथ त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिवसभर केला मात्र तो अद्यापही सापडू शकला नाही. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!