
स्थैर्य, वाई, दि.१९: मांढरदेव तालुका वाई येथील घाटात बोरवेलच्या गाडीतून पडून मध्य प्रदेशातील युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली.
गंगा प्रसाद यादव (वय २०) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी गंगाप्रसाद यादव हा बोरवेलच्या गाडीवर काम करत होता. मांढरहुन बोरवेलची गाडी साताऱ्याकडे येत होती. त्यावेळी मांढरदेव घाटामध्ये गंगाप्रसाद यादवचा अचानक तोल गेल्याने तो गाडीतून खाली पडला. या त्याच्या डोक्याला आणि मानेला गंभीर जखम झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला मृतावस्थेत आणण्यात आले होते. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.