अल्पवयीन भाचीस मामानेच नेले पळवून; दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड, दि.२७: माण तालुक्यातील एका अल्पवयीन भाचीस (मुलीस) वरकुटे (म्हसवड) येथील मामानेच स्वत:च्या मुलासाठी बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान पळवून नेले. दरम्यान, अल्पवयीन मुलीस पळवून नेत असताना म्हसवड-माळशिरस रोडवर सहा ते सात किमी अंतरावर बलोरो या चारचाकी गाडीचा अपघात झाल्याने ती मुलगी, मामा, मामाचा मुलगा व इतर पळून जाणारे सापडले. या सर्वांवर दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास माण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून नाहीशी झाली होती. तिच्या घरच्यांनी शोधाशोध केली; मात्र सापडली नसल्याने त्या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखला केला. त्यानंतर संबंधित मुलीची शोधमोहीम सुरू असताना सपोनि राजकुमार भुजबळ यांना म्हसवड पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली, की एका चारचाकी गाडीचा अपघात झाला आहे व त्या गाडीतील एक अल्पवयीन मुलीसह चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्या सर्वांना उपचारासाठी म्हसवड बसस्थानकासमोर आणले आहे, ही माहिती मुलीच्या घरच्यांना समजली. तेही पोलिसांच्या आधी म्हसवड येथे आले. त्यांनी पाहिले तर नातेवाईकच असून त्यांनीच मुलीला फूस लावून नेहल्याचा राग अनावर होऊन पळवून नेणारे व मुलीच्या घरच्यांमध्ये म्हसवड स्थांनकासमोरच धुमचक्री सुरू झाली. त्यावेळी दहिवडीचे सपोनि व कर्मचार्‍यांनी ती धुमश्‍चक्री थांबवली. यावेळी वरकुटे-म्हसवड येथील संबंधित मामा, त्याचा मुलगा व तर दोघे अशा चौघांनी संगनमत करून राहत्या घरातून कशाची तरी फूस लावून मुलीला पळवून नेल्याची तक्रार दहिवडी पोलीस स्टेशन दाखल असल्याचे समोर आले. 

पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी

याप्रकरणी तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एन. केंगले करत आहेत. 

अल्पवयीन भाचीस मामानेच आपल्या स्वत:च्या मुलास आपली सख्खी बहीण व दाजी देण्यास विरोध करतात म्हणून स्वत:च्या बलोरो गाडीतून अल्पवयीन मुलीस पळवून नेत असताना म्हसवड-माळशिरस रोडवर सहा किमी अंंतरावर एका ओढ्यात पुलाचे काम सुरू होते, त्यात या चारचाकीचा अपघात झाला. अपघात एवढा मोठा होता की गाडीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!