
दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव पाटील शिक्षक संघटनेचे कामकाज शिक्षक हिताचे आहे असे उद्गार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष केशवराव जाधव यांनी काढले.
सातारा जिल्ह्याच्या दौर्यावेळी लावंड बापू यांचे निवासस्थानी ते बोलत होते. यावेळी रामचंद्र लावंड, सिद्धेश्वर पुस्तके, महेंद्र जानुगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
केशव जाधव म्हणाले गेले अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर पुस्तके व रामचंद्र लावंड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या हिताचं काम सुरु आहे. यापुढेही जिल्ह्याचे असेच संघटनात्मक कामकाज सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.