स्थैर्य, फलटण, दि. २७ : येथील संगिनी फोरम या संस्थने अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपले वेगळेपण जपलेले आहे. संगिनी फोरम मार्फत केले जाणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हे कौतुकास्पद असून आगामी काळामध्ये फलटण व परिसरात संगिनी फोरम नक्कीच आगळे वेगळे काम करेल असा विश्वास केंद्र सरकारच्या मध्य रेल्वेच्या सल्लागार सौ. वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला.
महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. शिंदे अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमासाठी पोलादपुर येथील मनिषा भुतकर व बारामतीहुन स्मिता शहा प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. ग्रुपच्या अध्यक्षा निना कोठारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक करुन उपस्थितांना संगिनीच्या कार्याची माहीती दिली.
यावेळी भारतीय कनिष्ट महिला हाॅकी संघामधे निवड झाल्या बद्दल कु.रुतुजा पिसाळ, कु.वैष्णवी फाळके, कु.अक्षता ढेकळे याचां सत्कार करण्यात आला. इंडसइंड बॅकेच्या मॅनेजर प्रिती अतुल शहा यांचा सलग तिसर्यांदा सेवा पुरस्कार मिळाल्या बद्दल सन्मान करण्यात आला. त्यागी सेवेबद्दल सुजाता शहा, अलका शहा याचां सन्मान करण्यात आला.
सायकाॅलाॅजिस्ट झाल्याबद्दल स्मिता शहा, तर समाजातील पुराणवादी प्रथानां फाटा देऊन विधवा स्त्रीयांसाठी कार्यक्रम घेतल्या बद्दल श्रीमती मनिषा भुतकर, पोलादपुर तसेच भारत सरकार तर्फे रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सल्लागार समितीवर निवड झाल्या बद्दल आयडियल किड्सच्या संस्थापिका सौ. वैशाली शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.