स्थैर्य, फलटण, दि. १६: येथील युवानेते दिगंबर आगवणे यांचा आयुर ऑल इन वन शॉपीचे कामकाज कौतुकास्पद असून आगामी काळामध्ये आयुर ऑल इन वन शॉपी संपूर्ण राज्यामध्ये विस्तारणार आहे. यामध्ये तिळमात्र शंका नाही, असे मत शिवसेनेचे सातारा जिल्ह्याध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.
फलटण येथील आयुर ऑल इन वन शॉपीच्या मुख्य कार्यालयाला सातारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा नेते दिगंबर आगवणे, फलटण तालुका शिवसेनेचे अध्यक्ष विकास नाळे यांच्यासह फलटण तालुका शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयुर ऑल इन वन शॉपी मध्ये सर्व काही वस्तू हे ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळत आहेत. त्यामुळे कोणतीही वस्तू घेण्यासाठी ग्राहकांना एका दुकानावरून अधिक दुकानांमध्ये फिरण्याची गरज नाही. त्यामुळे अशा अनोख्या संकल्पना ग्रामीण भागांमध्ये रुजवणे हे अवघड असते परंतु हे अवघड काम युवानेते दिगंबर आगवणे यांनी यशस्वीरित्या केलेले आहे. ग्रामीण भागातील जनतेला कमी दरामध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू हे आयुर ऑल इन वन शॉपीच्या मार्फत दिगंबर आगवणे हे देत आहेत. ग्रामीण भागासह पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये ही आयुर ऑल इन वन शॉपीस उस्फूर्त प्रतिसाद मिळेल, याचीही खात्री मला आहे. असेही जाधव यांनी स्पष्ट केले.