स्थैर्य, फलटण, दि. १७ : अनर्घ फाऊंडेशनचे काम फलटणमध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरेल असे मत नगरसेवक अनुप शहा यांनी अनर्घ फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण देवस्थान चेअध्यक्ष कवीश्वर कुलआचार्य महंत श्री विध्वंस बाबा उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अनुप शहा यांच्या हस्ते फाउंडेशनच्या कार्यालयाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेवक शहा म्हणाले की, परमपूज्य हरिदास शास्त्री विध्वंस यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या फाउंडेशनच्या माध्यमातून धर्म कार्याबरोबरच समाजकार्याचे ही काम मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. यासाठी लागणारे सर्व ताकद मागे उभी केली जाईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर नोंदणी प्रमाणपत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य श्री विध्वंस बाबा व महंत श्री कापुसतळणी कर बाबा यांच्या हस्ते संस्थेचे प्रमुखविश्वस्त यांना देण्यात आले.