
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, वर्धा, दि. 28 : सावंगी येथील करोनाबाधित महिलेच्या घरातील एक १९ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह तर इतर तीन व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. या महिलेला सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिलेचं केशकर्तनालयाचं दुकान आहे.
करोना पॉझिटिव्ह निघालेली महिला ही रुग्ण महिलेची नणंद आहे. ती आपल्या भावासह सावंगी परिसरात सलून चालवीत असल्याची माहिती मिळते. या सलूनमध्ये सावंगीच्या रुग्णालयातील डॉक्टर कटिंग करण्यास येत असल्याने तर्कवितर्कांना सध्या शहरात उधाण आले आहे.
