
स्थैर्य, फलटण दि.25: अनपटवाडी, ता.कोरेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळवून ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणणार्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाच्या उमेदवारांचा सत्कार महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते येथील ‘लक्ष्मी विलास’ पॅलेस येथे संपन्न झाला.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणार्या अनपटवाडी (ता.कोरेगाव) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाने 9/0 असा दणदणीत विजय मिळवून सत्तांतर घडविले आहे. या विजयाबद्दल ना.श्रीमंत रामराजे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यावेळी अभिनंदन करुन ग्रामस्थांचे आभार मानले.
यावेळी अनपटवाडी गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.